Download the ComplaintHub App

Download the ComplaintHub App

Harassment against kyc

Language:

महोदय
मुद्दामच मराठीतून माझा अनुभव आपणास कळवत आहे. ग्राहक हा कसा त्रास देण्यासाठीच असतो हा आपल्या कर्मचारी वर्गाचा समज आहे व त्यासाठीच त्यांची आपण ठरवून व प्रशिक्षित करून आपण नेमणूक करता की काय असा आमचा समज होत आहे व तसा आम्हाला सतत अनुभव येत आहे. मी आपला बरेच वर्षांपासून ग्राहक आहे. माझे नांवावर दोन कनेक्शन आहेत. एक पुणे(महाराष्ट्र) आणि दुसरे छत्रपती संभाजी नगर येथे आहे. माझे दोन्ही ठिकाणी वास्तव्य असते. मी एक जेष्ठ सेवा निवृत्त नागरिक आहे.
१) माझ्या व्हाट्सएप नंबरवर kyc करुन घेण्यासाठीआपला एक मेसेज आला त्याप्रमाणे मागील आठवड्यामध्ये मी आपल्या धानोरी पुणे येथील केकान एजेंसी मध्ये गेलो व kyc करुन घेतले. महोदय मी एक वृद्ध व्यक्ति आहे त्यामुळे मी आपल्या कर्मचारी (एक स्त्री कर्मचारी) यांना विनंती केली की मला माझे कनेक्शन माझ्या मुलांच्या नावे करावयाचे आहे तेव्हा काय करता येईल. त्यांनी त्वरीत व तत्पर ऊत्तर दिले की ते शक्य नाही कारण तुम्ही हयात आहात व आपल्या पश्चातच ते आधी आपल्या पत्नीच्या नांवे व नंतर त्यांच्या पश्चात मग मुलांच्या नांवे करता येईल. मग मी त्यांना विचारले मग काय उपाय आहे. त्यांनी सांगितले की त्यांच्या नांवे नवीन कनेक्शन घ्या म्हणजे आम्ही लगेच kyc सहीत सर्व प्रोसिजर करून आपल्या सर्व अडचणी दूर करु. कसेही आता तुमचे kyc झालेलेच नाही तेव्हा येत्या 1 तारखेनंतर जुने डिस्कनेक्ट होईल तेच आम्ही तुमच्या मुलाच्यानावाने नवीन दाखवू. बघा जमेल तसे. आता आपणच योग्य मार्गदर्शन करावे म्हणजे आम्ही त्याप्रमाणे करु.
२) आज रोजी आपल्या छत्रपती संभाजी नगर(औरंगाबाद) येथील रेणुका एजन्सीला भेट दिली. माझा येथील ग्राहक क्रमांक आहे. 653659. सदरील कनेक्शन सुरुवातीस पवन एजन्सीत होते घर बदलामुळे ते रेणुका मध्ये ट्रान्सफर करावे लागले ते काम 2016 मध्ये झाले. त्यावेळी मी सर्व कागदपत्रे जसे की अ) रहिवासी असल्याबद्दलची कागद पत्र(Address proof) पवन एजन्सी कडून मिळालेली सर्व कागदपत्रे व आधार कार्डची झेरॉक्स कॉपी सर्व कागदपत्रे सुपूर्द केली व त्याप्रमाणे नोंदणी पण झाली कारण मला माझ्या खात्यात अनुदानपण मिळत होते. पण माननीय मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दोन पैकी एक गीव्हअप केले तर तेव्हापासून दोन्ही अनुदान बंद झाले. जेव्हा मी आपल्या वेबसाईटवर एन्क्वायरी करतो तेव्हा माझे आधार दोन्ही कनेक्शन्सना व्यवस्थित दिसते मग दोन्ही एजेन्सीमध्ये का नाही हा प्रश्न पडतो. महोदय ह्या कामासाठी दोन/दोन दिवस पुण्यात व छत्रपती संभाजी नगरला चकरा करणे आणि माझ्या प्रकृती स्वास्थ्यामुळे मला सततचा बस/रेल्वेने प्रवास करणे शक्य होत नाही व मला डॉक्टरने ड्रायव्हिंग मनाई केलेली आहे. सबब प्रायव्हेट कारने प्रवास करावा लागतो. शिवाय सहाय्यक शोधावा लागतो. खूपच खर्चिक आहे व प्रत्येक वेळी मुलांना सोबत घ्यावे लागते म्हणजे त्याच्या नोकरीत अडचण येते. मला फक्त पेन्शनच मिळते. हीच गोष्ट मी आपल्या कर्मचाऱ्यांना विनंती करून सांगितली पण ते म्हणतात त्यांचा नाविलाज आहे त्यांना त्यांच्या मालकांनी जे आज्ञापित केले तेच करावे लागते. त्यांच्या मालकांना विनंती केली तर ते म्हणाले आम्हाला कंपनीच्या सर्व सूचना पाळायला लागतात. एकंदरत टोलवाटोलवी व तारीख पे तारीख. पण त्या नेमका माझ्यासारख्या वृद्धाला काय त्रास होतो ह्याचा विचार व्हायला हवा.
आता आपणच सांगा मी काय करावे.
योगीराज चौधरी

First published on:

Disclaimer

If you have not found any solution, or information related to your issue, or want guidance to get redressal of any unique problem/complaint then you can connect with us without any hesitation.

You can message us directly from our Contact Us page or mail us at SUPPORT - help.complainthub@gmail.com. We will respond to you with the procedure and guidance for your issues to get a faster resolution.

Also Read

PNB logo
Banks

PNB: How to Lodge a Complaint to Punjab National Bank?

TPWODL logo

TPWODL – Electricity Complaint Helplines for the Consumers of TP Western Odisha Distribution Limited

Swiggy Logo

SWIGGY: Register a Complaint about SWIGGY, Instamart, and SWIGGY Partner

DPG Go Logo

DPG Goa: How to Register a Complaint with the Directorate of Public Grievances, Goa